पुण्यात भारत- इंग्लंड क्रिकेटची मॅच, पण GBS आजारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?

पुणे : पुणे येथील गहूंजे येथे 31 मार्चला भारत-इंग्लंड मॅच आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. असे असताना पुण्यात वाढत्या गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रूग्णसंख्या आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन याबाबत लवकरच एसओपी जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे.

गुलेन बॅरी सिंड्रोम या आजाराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला आहे. यावेळी ते म्हणाले, पुण्यात भारत-इंग्लंड मॅच आहे. तेथे पिण्याच्या पाण्याकडे लक्ष द्या. हा विकार पिण्याचे पाणी दूषित असेल तर किंवा न शिजवलेले अन्न/मांस खाल्ल्याने होतो.
यामुळे यावेळी गर्दी होणार आहे. बाहेरचे अन्न टाळा. पाणी उकळून प्या. घाबरून जाण्यासारखी स्थिती नाही. जे उपचार आहेत, ते महात्मा फुले जनारोग्य योजनेत समाविष्ट आहेत. शासकीय रुग्णालयात उपचाराची विशेष व्यवस्था निर्माण करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

दरम्यान, नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी महापालिकेला दिले आहे. पुण्यात जे रुग्ण आढळले आहेत, ते एकाच परिसरातील जास्तीक जास्त आहेत. यामुळे याठिकाणी विशेष लक्ष दिले जात आहे.
या दृष्टीने आरोग्य विभागाकडून नियमावली तयार केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. गुलेन बॅरी सिंड्रोम संसर्गजन्य रोग नाही.111 रुग्ण पुण्यात आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. त्यांच्याकडे प्रशासनाचे बारीक लक्ष आहे.
यामध्ये 80 रुग्ण हे 5 किलोमीटरच्या परिघात आहेत. 35,000 घरे आणि 94,000 नागरिकाच्या चाचण्या होणार आहेत. एनआयव्हीची (NIV) मदत घेतली जाते आहे. यामुळे घाबरून जाऊ नका, असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.