रक्षकचं बनला हैवान!! मद्यधुंद पोलीसाचे पाच वर्षाच्या चिमुरडीसोबत अश्लील कृत्य, लोणावळ्यातील घटनेने संताप…


पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. लोणावळ्याच्या पोलिसाचे दारूच्या नशेत चिमुकलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्षकच भक्षक बनल्याने विश्वास तरी कोणावर ठेवावा असा सवाल विचारण्यात येत आहे.

आरोपी पोलीस शिपाई सचिन सस्ते याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नाताळाच्या दिवशी ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते, म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता. तिथल्याच एका हॉटेलमधून त्याने भाकरी घेतली आणि जेवण केलं. त्या भाकरीचे बिल द्यायला तो हॉटेलमध्ये आला, तेव्हा मात्र तो दारूच्या नशेत होता.

त्यावेळी तिथं पाच वर्षीय चिमुरडीला सस्तेने पाहिलं. लघुशंकेचा बहाणा करून तो हॉटेलच्या मागे गेला आणि चिमुकलीसोबत अश्लील चाळे केले. मुलीने विरोध केला, मग तुला चॉकलेट देतो हे कोणाला सांगू नकोस असं तो तिला म्हणाला.

दरम्यान, हा घडलेला प्रकार मुलीने आईला सांगितला आणि या नराधम पोलिस रस्तेचं बिंग फुटलं. ज्या लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तो कार्यरत होता, त्याचं पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!