Indapur : एकजण मैदानात गाडी शिकत होता, अचानक नियंत्रण सुटले अन् दहा वर्षाचा चिमुकला गाडीखाली आला, भिगवणमध्ये भयंकर घटना…

Indapur : इंदापूर तालुक्यातील भिगवनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मैदानात चारचाकी वाहन चालवण्यास शिकत असणाऱ्या एकाने अचानक वाहन वळवले आणि शेजारीच सायकल खेळत असलेला दहा वर्षाचा चिमुरडा गाडीखाली सापडून गंभीर जखमी झाला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
समर्थ सुशील शिंदे (वय १० रा. भिगवण ता. इंदापूर जिल्हा पुणे) असे या मुलाचे नाव आहे.ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली, मात्र पोलिसांनी उशिरा गुन्हा दाखल केला.
सविस्तर माहिती अशी की, मंगळवारी संध्याकाळच्या वेळी एक जण चार चाकी गाडी शिकत होता मैदानात गाडी चालवत असताना अचानक त्याने गाडी वळवली आणि त्याचवेळी सायकल खेळत असलेला समर्थ गाडीच्या पुढच्या व मागच्या चाकाखाली एकाच वेळी सापडला. Indapur
विशेष म्हणजे समर्थ तेथे सायकल खेळत असलेली दिसत असतानाही ही गाडी वळवताना अत्यंत निष्काळजीपणाने गाडी वळवली. या घटनेत समर्थ गंभीर जखमी झाला. लगेच त्याला दवाखान्यात हलविण्यात आले. परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्याने स्थानिक दवाखान्यातून पुढे उपचारासाठी त्याला पाठवण्यात आले.
हडपसर येथे त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान आज त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुलाच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या घटनेने नंतर परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.