Indapur : इंदापूरमध्ये राजकीय समीकरण बदलणार! अजित पवारांना धक्का देत बडा नेता शरद पवार यांच्या गटात जाणार…


Indapur : जिल्हा परिषदेचे माजी सभापती व सोनाई उद्योगाचे संचालक प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत आहेत. शनिवारी दिनांक 3 निसर्ग मंगल कार्यालयात हा प्रवेश सोहळा होणार आहे ‌

खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सक्रिय झाले होते, त्यांनी गाव भेट दौरा सुरू केला होता.

मात्र अवघ्या तीन दिवसात त्यांनी त्यांचा पवित्रा बदलला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या घरी भेट देत त्यांचे मन परिवर्तन केले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षासोबत असल्याचे जाहीर केले होते. Indapur

त्यांच्या जाण्यानंतरही सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यात मोठी आघाडी मिळाली. अर्थात आप्पासाहेब जगदाळे यांच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष इंदापूर तालुक्यात मजबूत झाला होता.

दरम्यान, आता प्रवीण माने हे पुन्हा एकदा शरदचंद्र पवार पक्षांमध्ये प्रवेश करत आहेत. प्रवीण माने यांचा पक्षप्रवेश शनिवारी दुपारी चार वाजता पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!