Indapur News : इंदापूर येथील शाळकरी मुलीवर अत्याचार करणाऱ्या पंजाबच्या आरोपीला दोन वर्षाची सक्तमजुरी, तीन वर्षांपूर्वी घडलेला प्रकार…

Indapur News : इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली परिसरात शाळेतून घरी चाललेल्या शाळकरी मुलीला पंजाब मधील गुरुदासपूर येथील आरोपीने पाठलाग करत विनयभंग केला व अपहरणाचा प्रयत्न केला होता. यामुळे गुन्हा दाखल करून याबाबत तपास सुरू होता.
आता या खटल्यात बारामतीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पंजाब मधील जॉन स्टीफन रहिमत मासी याला दोन वर्षाची सक्तमजुरी व पाचशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. या घटनेचा निकाल जिल्हा न्यायाधीश श्रीमती जे.पी. दरेकर यांनी दिला आहे. Indapur News
यामुळे याबाबत चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर इंदापूर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. 18 ऑक्टोबर 2021 रोजी शेटफळ हवेली ते सुरवड या रस्त्यावर ही घटना घडली होती.
या खटल्यात सरकारी वकील एडवोकेट प्रसन्न जोशी यांनी सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद केला. शाळकरी पीडित मुलगी ही शाळेतून दुपारच्या वेळी घरी जात असताना जॉन स्टीफन हा पाठीमागून धावत आला आणि त्याने या पीडित मुली जवळ येऊन स्वतःसोबत नेण्याचा, अपहरणाचा प्रयत्न केला.
पुढे या तरुणीला जबरदस्तीने ओढून नेत पीडितेचा विनयभंग केला होता. ही मुलगी मदतीसाठी ओरडत होती. यावेळी येथील तरुणांनी तिची सुटका करून आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत सुनावणी श्रीमती दरेकर यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाचा व बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जॉन स्टीफन रहिमत मासी याला अपहरणाच्या प्रयत्नाबद्दल दोन वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.