Indapur News : चुलीत गेला पक्ष, चुलीत गेले नेते, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष!!! ‘या’ गावाने पुढाऱ्यांना वेशीवरच अडवले, गावात प्रवेश केला बंद…


Indapur News इंदापूर : सध्या मराठा समाजाला आरक्षण हा विषय चांगलाच तापला आहे. आता इंदापूर तालुक्यातील पळसदेव या ठिकाणी एक बॅनर लागला असून हा बॅनर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. (Indapur News)

यावर चुलीत गेला पक्ष, चुलीत गेले नेते, मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’, असे म्हटले आहे. दरम्यान, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना या ठिकाणी गाव बंदी करण्यात आली आहे.

या ठिकाणी दहीहंडी उत्सव होता, या कार्यक्रमास तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे व जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने येणार होते, दरम्यान प्रवीण माने या ठिकाणी आले परंतु गावच्या सुरुवातीच्या ठिकाणी त्यांना मराठा बांधवांनी अडवले. यामुळे आता गावकरी आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही असे फ्लेक्स सध्या पळसदेव गावामध्ये लागली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यानंतर प्रवीण माने येथूनच माघारी गेले. भरणे तर आलेच नाहीत, त्यांनी दहीहंडी उत्सव आयोजकांना फोनवर शुभेच्छा दिल्याची माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पळसदेव हे गाव सध्या चर्चेत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!