Indapur News : राजकीय नेत्यांचे टेन्शन वाढलं! चुलीत गेले नेते अन् पक्ष म्हणत इंदापूरमधील कुरवली आणि हिंगणेवाडी गावात पुढाऱ्यांना नो एन्ट्री


Indapur News  इंदापूर : अनेक गावांमध्ये नेत्यांना बंदीचा आकडा वाढत चाललाय. दुसरीकडे नेत्यांच्या वाहनांचा ताफाही मराठा आंदोलक अडवू लागले आहेत. आता इंदापूर तालुक्यातील कुरवली आणि हिंगणेवाडी येथे आज नागरिकांनी शपथ घेत मराठा आरक्षण मिळेपर्यंत गावात राजकीय पक्षांना गावबंदी घालण्याचा निर्णय घेतला.

यामध्ये लोकांनी शपथ घेतली आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. राज्यातील ५०० हून अधिक गावांमध्ये मागील आठवड्यापर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. Indapur News

आता त्यामध्ये दररोज काही गावे वाढू लागली आहेत. त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर लोकांमध्ये संतापाची भावना वाढू लागली आहे.

तसेच आज इंदापूर तालुक्यातील कुरवली येथे सर्व समाजाच्या नागरिकांनी एकत्र येऊन मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला, मराठा आरक्षण मिळेपर्यंत या गावांमध्ये कोणत्याही पक्षाचा राजकीय नेता येऊन भाषण करणार नाही अथवा जाहीर कार्यक्रमास हजेरी लावणार नाही अशा स्वरूपाची घोषणा देखील यावेळी ग्रामस्थांनी केली. एकूणच या भागात मराठा आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, कुरवली येथे हा निर्णय घेत असतानाच हिंगणेवाडी येथे देखील नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एकत्र येत मराठा आरक्षण वेळेपर्यंत हिंगणेवाडी परिसरातही कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!