Indapur News : मायलेकींचा मृतदेह राहत्या घरात धक्कादायक अवस्थेत आढळले, पतीला नातेवाईकांना दिला चोप, इंदापूर तालुक्यातील घटना…

Indapur News इंदापूर : इंदापूर तालुक्यातील हगारेवाडी येथे मायलेकी मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून महिलेच्या पतीला पोलिस घेऊन जात असताना नातेवाईकांनी त्याला चोप दिला आहे. या धक्कादायक घटनेने इंदापूर तालुका हादरला आहे. Indapur News

अश्विनी सागर म्हस्के (वय.२८) व सानवी सागर म्हस्के (वय.४) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता.२९) दुपारी पावणे एकच्या सुमारास राहत्या घरात उघडकीस आली आहे.
याप्रकरणी मृत अश्विनीचे भाऊ तात्या आण्णा भोंग (रा. निमगाव केतकी, इंदापूर) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून महिलेचा पती सागर म्हस्के याला ताब्यात घेतले आहे.

आरोपीला पोलीस घेऊन जात असताना मृत महिलेच्या संतप्त नातेवाईकांनी पोलिसांसमोर मारहाण केली.अश्विनी आणि सानवी यांची हत्या केली आहे की त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही.
मिळालेल्या माहिती नुसार,तेजश्री शेखर म्हस्के आणि मृत अश्विनी म्हस्के या सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहेत. तेजश्री दुपारी शेतातून घरी आल्या. त्यावेळी घराची खिडकी उघडी दिसली. तेजश्री यांनी खिडकीतून पाहिले असता अश्विनी आणि सानवी यांचा मृतदेह घरातील पत्र्यच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने लटकल्याचे निदर्शनास आले.
या घटनेची माहिती वालचंदनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक मिलींद मिठापल्ली, विजय टिळकेकर, विनोद पवार आणि प्रमोद तापसे घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी इंदापूर येथे पाठवला. याप्रकरणी मृत अश्विनीचे भाऊ तात्या भोंग यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.