Indapur Crime : अनैतिक संबंधात अडथळा ठरत होता पती, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा, इंदापूरमध्ये घडली भयंकर घटना..


Indapur Crime इंदापूर : अनैतिक संबंधात अडचण ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच आपल्या प्रियकर आणि त्याच्या मित्रासोबत प्लॅन केला. त्यानंतर प्रियकराने केलेल्या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे इंदापूरात मोठी खळबळ उडाली आहे. Indapur Crime

ईश्वर भीमराव कांबळे (रा. टेंभुर्णीवेस नाका, इंदापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर याप्रकरणी ईश्वर कांबळे यांचे वडील भीमराव सुदाम कांबळे (वय.६० रा. आंबेगाव कुबेर प्रॉपर्टी, ता हवेली, जि. पुणे) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी पत्नी रूपाली ईश्वर कांबळे आणि तिचा प्रियकर पिनेश उर्फ मयूर महेंद्र धाईजे (दोघे रा. टेंभुर्णी नाका, इंदापूर) आणि प्रियकराचा मित्र नवनाथ शेंडे (रा.अंबिकानगर, इंदापूर) यांच्यावर इदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मृत ईश्वर कांबळे हे फिर्यादी यांचा मोठा मुलगा आहे. त्याला दोन मुले आहेत. दीड वर्षापूर्वी ईश्वरच्या पत्नीचे आणि सासरच्या लोकांचे भांडण झाले होते. त्यानंतर ती ईश्वर व मुलांना घेऊन आपल्या माहेरी बाभुळगाव (ता. इंदापूर) येथे आली.

काही दिवसांनी ती नवऱ्यासह इंदापूर मधील टेंभुर्णी वेस नाका परिसरात भाड्याने घर घेऊन राहु लागली. दरम्यान, तिचे आणि घराजवळ राहणाऱ्या पिनेश उर्फ मयुर धाईंजे याच्याबरोबर अनैतिक संबंध निर्माण झाले. याची कल्पना ईश्वरने वडिलांना दिली होती.

त्यानंतर फिर्यादी यांनी ही बाब सुनेच्या आई-वडिलांच्या कानावर घातली. पिनेशला देखील समजावून सांगण्यात आले. मात्र, त्याच्या किंवा ईश्वरच्या पत्नीच्या वर्तनात काहीच फरक पडला नाही. पिनेश याच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे इश्वर सतत सांगत होता.

दरम्यान, सोमवारी (ता.२३) रात्री दहाच्या सुमारास पिनेश धाईंजे व विजय शेंडे यांनी संगनमत केले. अनैतिक संबंधाच्या कारणावरुन घरी जाऊन ईश्वरसोबत वाद घातला. त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने पिनेश याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने ईश्वरच्या पोटावर वार करुन गंभीर जखमी केले.

त्यानंतर तिघे ही तेथून पळून गेले. जखमी ईश्वरला त्याच्या नातेवाईकांनी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरु असताना बुधवारी (ता.२५) सकाळी त्याचा मृत्यू झाला.

या घटनेत रुपाली कांबळे याही जखमी झाल्या होत्या. मात्र त्यांनी स्वतःच आपल्या हातावर वार करून घेतल्याची चर्चा शहरात आहे. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अन्य दोघे आरोपी इंदापूर पोलिसांच्या कोठडीत आहेत. त्यांना इंदापूर न्यायालयाने ३० ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!