Indapur Crime : ज्याला भावासारख जपलं त्यानेच काटा काढला! इंदापूर गोळीबार प्रकरणी धक्कादायक माहिती आली समोर…


Indapur Crime : हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या हत्याकांडाचे सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.

या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले असून चार आरोपींना अटक केली आहे. तुरुंगात झालेल्या मारहाणीचा बदला म्हणून आरोपींनी अविनाश धनवे याचा खून केल्याचे आता तपासात समोर आले आहे. Indapur Crime

अविनाश बाळू धनवे (वय ३१) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शिवाजी बाबुराव भेंडेकर (वय ३५, पद्मावती रोड, साठे नगर, आळंदी देवाची), मयूर उर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २०, आंबेडकर चौक, पोलीस चौकीसमोर आळंदी देवाची), सतीश उर्फ सला उपेंद्र पांडे (वय २०, चरवली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची) आणि सोमनाथ विश्वंभर भत्ते (वय २२, मरकळ रोड, सोळू) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आणखीन चार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

दरम्यान याप्रकणी आणखीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. अविनाश पंढरपूरला जात असताना त्याच्या मित्राशी संगनमत करून हा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये काही लोकांनी होटलमधे एंट्री करुन एका व्यक्तीच्या डोक्यात गोळ्या घातल्या असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामधील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे फक्त गोळ्यांचं झाडल्या नाहीत तर कोयत्याने देखील वार करण्यात आले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!