आता ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही आयकर! मोदी सरकारची मोठी घोषणा
पुणे : आयकर भरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा करत वर्षाला 2.5 लाख रुपये उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा कर लागणार नसल्याची माहिती दिली आहे. याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
जर तुमचे उत्पन्न वर्षाला 2.5 लाख रुपये असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. त्याच वेळी अनेक प्रकारचे उत्पन्न आहेत ज्यावर एक रुपयाही कर भरावा लागत नाही. कोणते उत्पन्न करमुक्त आहे आणि कोणते नाही हे सविस्तरपणे जाणून घेऊया.
काम करणाऱ्या व्यक्तीने 5 वर्षांनंतर आपली कंपनी सोडली असेल, तर त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. जर आपण सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल बोललो तर त्यांचे 20 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे.
दुसरीकडे खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे उत्पन्न 10 लाख रुपयांपर्यंत करमुक्त आहे. पीपीएफच्या पैशांवर कोणत्याही प्रकारचा कर नाही. यावर मिळणारे व्याज, मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर मिळणारे पैसे, हे तिन्ही करमुक्त आहेत.
यासोबतच, जर कर्मचाऱ्याने 5 वर्षे सतत काम केल्यानंतर त्याचा EPF काढला तर त्याला या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही. यामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.