आयकर विभाग ॲक्शन मोडवर ; करोडो लोकांना इन्कम टॅक्सची नोटीस, करदात्यामध्ये धडधड..


पुणे : नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीआधी आयकर विभागाने करदात्यांना नोटीसा पाठवण्याचा धडाका लावला आहे. येत्या एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे पण त्याआधी इन्कम टॅक्स विभाग भरगच्च पगार असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना एनयूडीजी नोटीस पाठवत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये धडधड वाढली आहे.

आयकर विभागाने मोठ्या प्रमाणावर करदात्यांना “NUDGE” कर पाठवण्यास सुरुवात केली आहे. या नोटीसचा उद्देश कडक कारवाई करणे नसून, आयकर विवरणपत्र मध्ये झालेल्या संभाव्य चुका वेळेत दुरुस्त करण्याची संधी देणे हा आहे. विशेषतः ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा अधिक आहे किंवा जे कंपन्यांमध्ये वरिष्ठ व्यवस्थापनाच्या भूमिकेत आहेत, अशा प्रकरणांकडे अधिक लक्ष दिले जात आहे.

आयकर विभागाकडून पाठविण्यात येत असलेल्या ‘NUDGE या शब्दाचा अर्थ म्हणजेच डेटाचा गैरहस्तक्षेपात्मक वापर करून करदात्यांना मार्गदर्शन करणे आणि सक्षम करणे. ही कोणतीही छापा टाकण्याची किंवा दंडाची नोटीस नाही. ती एक प्रकारची सल्लागार सूचनाआहे. या माध्यमातून करदात्यांच्या ITR मध्ये दिलेली माहिती आणि आयकर विभागाकडे उपलब्ध असलेल्या डेटामध्ये तफावत असल्याचं दिसून येतं.

आयकर विभागाकडून अशी नोटीस आल्यास दुर्लक्षित न करताआपला ITR आणि AIS यांची सविस्तर पडताळणी करावी. जर काही चूक आढळली, तर सुधारित किंवा अद्ययावत रिटर्न दाखल करणे योग्य ठरते. आवश्यक असल्यास अतिरिक्त कर भरल्यास भविष्यातील दंड किंवा चौकशी टाळता येऊ शकते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!