खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस? मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांसमोर मोठा गौप्यस्फोट केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस मिळाली असल्याची माहिती दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

असे असताना काही वेळातच शिरसाटांनी आपले वक्तव्य मागे घेत हे वाक्य आपल्या तोंडी घातलं गेलं, असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र एकनाथ शिंदे दिल्लीला गेल्याने या चर्चा जास्त वाढल्या आहेत. आयकर विभाग हा प्रत्येकाची तपासणी करत असतो.
मला नोटीस आली आहे, श्रीकांत शिंदे साहेबांना नोटीस आली आहे. आणखी कोणाला नोटीस येत असेल. त्यामुळे आम्ही आयकर विभागाला उत्तर द्यायला बांधील आहोत. मला 9 तारखेला उत्तर द्यायला सांगितले होते, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, तसेच मी त्यांच्याकडे वेळ मागून घेतला आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले होते. मात्र, काही वेळातच त्यांनी युटर्न घेतला. आणि याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. नंतर ते म्हणाले, मला आयकर विभागाची नोटीस आली.
हे स्पष्ट केले. मला काही पत्रकारांनी विचारलं श्रीकांत शिंदेनासुद्धा नोटीस आली आहे का? तर मी म्हटलं श्रीकांत शिंदेंना सुद्धा जरी नोटीस आली असेल तर मला माहीत नाही. श्रीकांत शिंदे यांना नोटीस आली की नाही हे मला माहित नाही, हे वाक्य माझ्या तोंडी घातले गेले, असेही ते म्हणाले.