आयकर विभाग बेफिकीर! चक्क मृत व्यक्तीलाच पाठवली इन्कम टॅक्सची नोटीस अन….


पुणे : आयकर विभागाने एका मृत व्यक्तीच्या नावाने आयकर नोटीस धाडल्याची गंभीर घटना समोर आली आहे. 2019 मध्ये निधन झालेल्या व्यक्तीला आयकर विभागाने ही नोटीस बजावली आहे.पतीच्या निधनाची माहिती आयकर विभागाला कळवून देखीलं आयकर विभाग वारंवार नोटीस धाडत आहे.या घटनेमुळे आता मृताच्या पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने आयकर विभागाकडून पाठवण्यात आलेली ही नोटीस रद्द केली आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, मृत व्यक्तीला अशा प्रकारची नोटीस पाठवणे हे गंभीर प्रशासकीय त्रुटी दर्शवते. सरकारी यंत्रणांकडून नागरिकांना, विशेषतः दिवंगत व्यक्तींच्या कुटुंबीयांना अशा प्रकारे त्रास दिला जाऊ नये. अशा घटनांमुळे प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आयकर विभागाला भविष्यात अधिक दक्षता घेण्याचे संकेत मिळाले आहेत. मृत व्यक्तीच्या खात्याशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवणे आणि कायदेशीर प्रक्रियांचे योग्य पालन करणे आवश्यक असल्याचे या घटनेतून दिसून येते. या निर्णयामुळे अशाच प्रकारच्या इतर प्रकरणांमध्येही कायदेशीर दिशा मिळू शकते.

दरम्यान केवळ नोटीस रद्द करूनच नव्हे, तर आयकर विभागाच्या या निष्काळजीपणावर न्यायालयाने तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!