घटना दुर्दैवी ..वेदनादायक.. क्लेशदायक .. घृणास्पद आमदार अशोक पवार यांची मुलगा अपहरण प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त


पुणे : शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार याचं अपहरण करुन त्याचे विवस्त्र महिलेसोबत फोटो काढत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी ऋषिराज पवार यांनी शिरुर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती. या सर्व प्रकरणावर आता आमदार अशोक पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘दुर्दैवी.. दुःखद.. वेदनादायी.. घृणास्पद.. निंदनीय..’ या चार शब्दांचा कॅप्शनमध्ये उल्लेख करत अशोक पवार यांनी त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

शिरुरचे आमदार अशोक पवार यांनी त्यांच्या मुलासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल भूमिका मांडली आहे. ते म्हणाले की, आज दुर्दैवी घटना घडली, घृणास्पद म्हणजे विरोधी माणसं कुठल्या थरापर्यंत जातात. आज माझ्या मुलाला मोटारसायकलवर असताना एकानं प्रचार करण्यासाठी नेलं, जवळच्या वस्तीत नेलं, तिथं गेल्यावर कोंडलं, त्याचा गळा पट्टीनं की फडक्यानं आवळण्यात आला. त्याला सांगितलं तू कपडे काढ, एका महिलेला विवस्त्र करुन अत्यंत घृणास्पद प्रकार केला. आमच्या जीवनामध्ये आम्ही जे चांगलं वागतो, समाजाशी एकरुप होतो, पण मनाला वेदना झाल्या, कुठल्या थराला जाणार आहेत ही लोकं? अशी भूमिका अशोक पवार यांनी मांडली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!