पुण्यात सहायक पोलीस आयुक्त गायकवाडांनी अस का केलं?, पत्नीसोबत पुतण्याच्या हत्येचा घटनाक्रम आला समोर..

पुणे : पुण्यात अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. हि घटना घडून पाच- सहा दिवस झाले असतानाही या घटनेमागचं रहस्य कायम आहे.
मोनी गायकवाड (वय. ४४, पुतण्या दीपक गायकवाड (वय. ३५) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवले होते.
या दुहेरी हत्या आणि आत्महत्येच्या प्रकरणात स्वत: भरत गायकवाड हे आरोपी आहेत. पण आता तेच ह्यात नसल्याने या पूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी, खरं कारण शोधणं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
भरत गायकवाड यांनी जवळपास ८ दिवसांची सुट्टी त्यांनी मंजूर करून घेतली होती. त्यानंतर ही सुट्टी घालविण्यासाठी ते पुण्यात आपल्या घरी आले होते. पण याच सुट्टीत ही अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली.
मिळालेल्या माहिती नुसार, घटनेच्या दिवशी मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास जेव्हा सगळीकडे शांतता होती त्यावेळेस अचानक भरत गायकवाड यांच्या बेडरूममधून मोठमोठ्याने पहिल्यांदा भांडणाचा आवाज आला. नंतर जोरजोराने ओरडण्याचा आवाज आला. यानंतर काही क्षणातच गोळ्या झाडण्याचा आवाज आला.
गोळ्यांचा आवाज आल्याने घरच्या सगळ्या सदस्यांनी म्हणजे दोन मुले, पुतण्या आणि भरत गायकवाड यांची आई हे त्यांच्या बेडरूमच्या दरवाजाजवळ गेले आणि जोरजोरात दरवाजा ठोठवण्यास सुरुवात केली.
दरवाजा उघडण्याची त्यांनी विनंतीही केली. पण आतून काहीही आवाज येत नव्हता म्हणून दुसऱ्या चावीने पुतण्या दीपक गायकवाड याने दरवाजा उघडला.. त्याने आत डोकावून पाहताच पुन्हा एकदा गोळीबार झाला. यामध्ये अॅड. दीपक गायकवाड गंभीररित्या जखमी झाला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा देखील जागीच प्राण गेला.
त्यानंतर भरत गायकवाड यांच्या मोठ्या मुलाने बेडरुममध्ये जाऊन त्यांच्या हातातील बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला. पण त्याला देखील भरत गायकवाड यांनी धमकावलं.. जर तू इथून गेला नाहीस तर तुझ्यावर पण गोळी झाडेल असं म्हणत त्याला देखील खोलीतून बाहेर ढकललं आणि दरवाजा बंद करून घेतला.
काही क्षणात पुन्हा एकदा फायरिंगचा आवाज आला आणि सर्व काही शांत झालं. घरच्या लोकांनी पुन्हा दरवाजा उघडून पाहिलं तेव्हा त्यांना दोन व्यक्ती म्हणजे भरत गायकवाड आणि त्यांची पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हे दोघेही तिथे मृतावस्थेतच होते.
हा सर्व प्रकार गायकवाड कुटुंबीयांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात कळवला. ज्यानंतर आता पोलिसांचा तपास सुरू झाला. पण सध्या या पूर्ण प्रकरणाचा छडा लावणं हे मोठ आव्हान पोलिसांसमोर आहे.