शिरुर तालुक्याचे दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या स्मारकाचे १ ऑगस्ट रोजी लोकार्पण ! प्रथम स्मृतीदिनी राज्यभरातील मान्यवर शक्तिपीठावर येणार !!

उरुळी कांचन : शिरुर तालुक्याच्या सार्वांगिण जडणघडणीत निरंतर योगदान उभे केलेले दिवंगत नेते माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रथम स्मृतीदिनी त्यांच्या स्मृती सदैव जनतेच्या स्मरणात रहाव्या म्हणून त्यांच्या मूळ गावी तर्डोबाचीवाडी येथे त्यांच्या स्मृतीशिल्प असलेल्या ‘ शक्तीस्थळ ‘या स्मारकाचे लोकार्पण १ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल पाचर्णे यांनी दिली आहे.



शिरुर तालुक्याच्या सामाजिक व राजकीय वाटचालीत ४० वर्षे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे अखंड योगदान उभे केले आहे. दुष्काळी शिरुर तालुक्यात सिंचनाच्या कामापासून ते अगदी शैक्षणिक संस्था, शैक्षणिक वसतीगृहे, एमआयडीसी ते घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेपर्यंत त्यांनी योगदान उभे केले आहे. त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांनी २ वेळा शिरुर तालुक्याचे प्रतिनिधित्व करताना तालुक्याला हक्काचे शेतीचे पाणी, राष्ट्रीय तसेच राज्य मार्गांचा विकास , देवस्थान व धार्मिकस्थळांचा विकास आदी प्रमुख कामे त्यांच्या काळात ठळक वैशिष्ट्ये ठरली आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी नेटाने शेती करीत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्याचे प्रयत्न केले.
शिरूर -हवेली अशा झपाट्याने शहरीकरण वाढत असलेल्या मतदारसंघात त्यांनी ३ हजार कोटींची कामे करून तालुक्याचा विकासाचा अनुशेष भरुन काढला होता. कर्करोगासारख्या आजाराशी झुंज देताना त्यांना वयाच्या ७१ व्या वर्षी म्हणजे ११ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांचे निधन झाले. तालुक्याने लोकनेता अशी दिलेल्या उपमा त्यांनी बहुधा त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा परिचय करीत निभावली. बाबुराव पाचर्णे यांचे कार्य जनतेच्या स्मरणात रहावे म्हणून तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून स्मारक व्हावे अशी इच्छा व्यक्त केली जात होती. त्यानुसार त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी स्मारकाचे काम पूर्ण होऊन या ‘शक्तिस्थळ’ लोकार्पण राज्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित १ ऑगस्ट २०२३ होणार असल्याची माहिती पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे यांनी दिली.
