उरुळी कांचन येथे अल्पवयीन मुलीवर कोयत्याचा धाक दाखवून दोघा भावांकडून वारंवार बलात्कार; घटनेचे उरुळी कांचन शहरात संतप्त प्रतिक्रिया, काढणार मूक मोर्चा!!


उरुळी कांचन : कोयत्याचा धाक दाखवून आई – वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पंधरा दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची घटना धक्कादायक घटना समोर आली आहे.

हि घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी. परिसरात बुधवारी (ता. १२) संध्याकाळी बारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे . याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार पोलिसांनी दोन जणांना बेड्या ठोकल्या आहे.

इरफान शेख (मुजावर) व आयुद्ध शेख (मुजावर), (रा. दोघेही, दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत मुलीची आई हि उरुळी कांचन येथील दत्तवाडी परिसरात कुटुंबासहित राहतात. मंगळवारी रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी मुलीची आई या बाहेर आल्या होत्या.

यावेळी मुलगी अभ्यास करीत असलेल्या खोलीच्या बाहेर आयुब मुजावर हा दिसून आला. यावेळी पिडीतेच्या आईला आयुब मुजावर याने पहिले असता पळून गेला. मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून आत पाहिले असता यावेळी खोलीत इरफान मुजावर हा खोलीत दिसून आला. मुलीच्या आईला पाहून तो तेथून पळून गेला.

त्यानंतर मुलीच्या आईने मुलीकडे अधिक चौकशी केली असता तिने सांगितले कि, आई, वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागिल पंधरा दिवसांपासून तिच्यावर दोघेजण बलात्कार करत होते. मात्र दोघांकडून आई वडिलांच्या जिवाला भिती असल्याने, मागिल पंधरा दिवसांपासून दोघांचे अत्याचार निपुटपणे झेलत होती.

मंगळवारी संध्याकाळी तिच्याशी आळीपाळीने बळजबरीने शरीर संबंध करण्यासाठी आले असल्याची माहिती पिडीत मुलीने तिच्या आईला सांगितले. यावरून पिडीत मुलीच्या आईने इरफान शेख व आयुब शेख याचे विरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कायदेशिर तक्रार दिली आहे.

तसेच यावेळी नातेवाईकांनी चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला असला तरी पोलिसांनी मात्र त्यात उल्लेख केला नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान , लोणी काळभोर पोलिसांनी इरफान शेख व आयुब शेख या दोघांनाही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका गुन्हात संधी मिळताच दुसरा गुन्हा..!

दरम्यान या गुन्हात अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींनी यापूर्वी सोशल मिडीयावर महापुरुषांच्या बद्दल आक्षेपार्य लिखाण करुन अवमान केल्याचा प्रकार केला होता.

त्यावेळी पोलिसांनी या दोघा आरोपींवर गुन्हे दाखल केले होते. मात्र या आरोपींच्या कृत्यांवर साधक बाधक कारवाई केल्याची नागरीकांत चर्चा आहे. त्यानंतर हा गुन्हा पचल्यानंतर या आरोपींना दुसरा गुन्हा करण्यात धैर्यष्ट वाढल्याची चर्चा आहे .

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!