उरुळी कांचनमध्ये ग्रामपंचायत सदस्य महिलेच्या पतीवर जमाव जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल ; वीजेचा खांब शेतात उभारल्याचा कारणावरून मारहाण

उरुळी कांचन : शेतजमिनीवर वीजेचा खांब उभारण्यावरून,ग्रामपंचायत सदस्याच्या पतीने एकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उरुळी कांचन येथे घडला आहे. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्याच्या पतीवर उरुळीकांचन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निर्भय राजेंद्र कांचन (वय 29, रा. गडकरी वस्ती, उरुळी कांचन) यांनी याबाबत उरुळीकांचन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सुभाष बगाडे व त्यांचा पुतण्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 18 सष्टेंबर रोजी तक्रारदाराने आपल्या,शेतात लाईट खांब उभे करताना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता चिडून जाऊन सुभाष बगाडे यांनी शिविगाळ करुन मारहाण केली. तसेच मोटरसायकलवरून जात असताना मारहाण केली . त्यानुसार सुभाष बगाडे वत्यांचे साथीदार यांच्यावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमवून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

