शेतकऱ्यांचे नवीन वर्षात आर्थिक गणित बिघडणार, खतांच्या किमतीत होणार वाढ, जाणून घ्या..


मुंबई : शेतकऱ्यांना शेतीच्या खतांचा दरवाढीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून सतावत आहे. यातच आता नवीन वर्षात हे दर अजूनच वाढणार असल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या दरात २०० ते ३०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून शेतीचा उत्पादन खर्च वाढणार आहे. डीएपी, टीएसपी आणि १०:२६:२६ तसेच १२:३२:१६ या खतांच्या किमतीत वाढ होणार असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण येणार आहे. ‘

आधीच खरीप हंगामातील नुकसानीची भरपाई करणे शेतकऱ्यांसाठी एक आव्हान बनले असताना त्यातच रासायनिक खतांच्या किमतीतील वाढ शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवणारी आहे. शेतीच्या उत्पादन खर्चात दरवर्षी वाढ होत आहे.

यात रासायनिक खतांची भूमिका आणखी महत्वाची असते. दरम्यान, सततच्या दरवाढीला विरोध करत सरकारकडून या वाढीव दरांचे पुनरावलोकन करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

दरम्यान, फक्त पुणे जिल्ह्यात तीन खताच्या सुमारे नऊ लाख बॅगची मागणी असते. या तीन खतापोटी दर वाढल्यामुळे २५ कोटींचा भुर्दंड शेतकऱ्यांच्यावर पडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!