शेवटी हातातील’ घड्याळ ‘ हीच ठरली अजित पवारांची शेवटची ओळख; प्रत्यक्षदर्शीकडून स्पष्ट माहिती….

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान लँडिंग करताना झालेल्या दुर्घटनेत निधन झाले. त्यांच्या निधनाने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बारामती येथे झालेल्या या भीषण विमान अपघातात मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले होते. अखेर हातातील घड्याळावरूनच अजित पवारांची ओळख पटल्याच समोर आलं आहे.

बारामती येथे झालेल्या विमानाच्या भीषण अपघातात उपस्थित नागरिकांचा थरकाप ऊडाला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंधरा-वीस मिनिटात आग आटोक्यात आणली. हा अपघात इतका भयानक होता की मृतदेहांची ओळख पटवणे, कठीण होते. एक मृतदेह पूर्णपणे जळालेला आणि सुजलेला होता. मात्र त्या मृतदेहांच्या हातातील घड्याळावरून हा मृतदेह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचचं असल्याचं पोलिसांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्पष्ट झालं. घड्याळ हेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.
स्फ़ोट झाल्यानंतर एका महिलेने घटनेच भयानक वर्णन सांगितलं, स्फ़ोट आणि आगीच्या ज्वाळा इतक्या भयानक होत्या की,
आम्ही घाबरलो, पलीकडे गेलेलो. तेव्हा मृतदेह हे विखुरलेले होते. एका मृतदादाचे शीर धडा वेगळे झाले होते आम्ही खूप घाबरलो होतो.पोलिसांनी आल्यावर आम्हाला बोलावून घेतलं आणि पाणी आणायला लावल, त्यांची बॉडी उडून पडलेली आम्ही प्रत्यक्षात पाहिलेली. धड दिसलं नाही आणि अर्धी बॉडी फुगलेल्या अवस्थेत होती.

त्यानंतर आम्ही मृतदेह झाकण्यासाठी ब्लँकेट दिलं आणि ती गुंडाळली. दोन बॉडी बाजूला आणि इतर तीन बॉडी त्यामध्ये अडकून पडलेल्या होत्या, असं प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितलं. दादांची ब़ॉडी आम्ही गॉगल आणि वॉच वरून ओळखलं असं त्या महिलेने सांगितलं. अखेर दादांची ओळख त्या महिलांना घड्याळावरूनच पटली.