राज्यात आज ‘या’ भागात विजेच्या कडकडाटासह पाऊसाची पडण्याची शक्यता…!
मुंबई : या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. दरम्यान हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (१३ एप्रिल) राज्याच्या विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर १३ ते १५ एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा मोठं संकट निर्माण झालं आहे.
अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतपिकाला भाव नाही आणि दुसरीकडे अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे आता शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.