धक्कादायक! शिंदवणेत गर्भवती पत्नीच्या पोटात पतीने मारली लाथ, गर्भपात झाल्याने खळबळ…!


उरुळी कांचन : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या शिंदवणे गावात एक संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक कारणावरून झालेल्या वादातून गर्भवती पत्नीला पतीने बेदम मारहाण केली आहे. या रागातून त्याने पत्नीच्या तिच्या पोटावर लाथ मारली. यामुळे गर्भपात झाला.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पतीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुनील विनायक धारक (रा. शिंदवणे, लाेणी काळभोर) असे गुन्हा दाखल केलेल्या पतीचे नाव आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

याप्रकरणी २३ वर्षीय पत्नीने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. धारक याची पत्नी गर्भवती आहे. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद झाला होता. सुनीलने पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आरोपी पतीने तिच्या पोटात लाथ मारली. मारहाणीत गर्भपात झाला.

 

 

पत्नीने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. पत्नीला बेदम मारहाण करून गर्भपातास जबाबदार ठरल्याने पोलिसांनी आरोपी सुनीलच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धायगुडे करत आहेत. या घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!