संभाजीनगरमध्ये राजकीय पदाधिकाऱ्याची महिलेकडे धक्कादायक मागणी!! खूप सुंदर दिसतेस, मला तुझ्याशी शरीरसंबंध..


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कदायक घटना समोर आली आहे. इथे तीन जणांनी एका मेडिकल चालवणाऱ्या महिलेचा पाठलाग करून तिची छेड काढली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित महिलेकडं शरीर सुखाची मागणी केली आहे.

याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, अशोक पवार पाटील आणि रवींद्र एकनाथ गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरा आरोपी अज्ञात असून त्याच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हे तिन्ही आरोपी मागील काही दिवसांपासून पीडित महिलेचा पाठलाग करत होते. त्यांनी पीडितेचे फोटो काढून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अशोक पवार हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे. पवार आणि रवींद्र गायकवाड हे पीडितेच्या ओळखीचे आहेत. या ओळखीतूनच ते ‘तू खूप सुंदर दिसतेस, तुझ्याशी मैत्री करायची आहे’, असे बोलायचे. सुरुवातीला तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.

मात्र, काही दिवसांपासून ते चोरुन तिचा पाठलाग करीत असल्याचे दिसले. पवार, गायकवाड आणि अनोळखी अशा तिघांनी तिचे फोटो काढत पीडितेकडे शरीरसुखाची मागणी केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आरोपीनं अशाप्रकारे महिलेची छेड काढल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group