पुण्यात गुंड भाच्याने केली मामाला मारहाण, पैसे लुबाडून रिक्षा नेली चोरुन; हादरवणारे कारण आलं समोर…


पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे याची सध्या चर्चा सुरू आहे. येथे गुंड भाच्याने रिक्षाचालक असलेल्या मामाला बोलावून घेतले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याला मारहाण करुन जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेतले.

तसेच त्यांची रिक्षा जबरदस्तीने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार गोळीबार मैदानाजवळील कॅन्टोंमेंट हॉस्पिटलजवळ सोमवारी (ता. ३१) सकाळी पावणेबारा वाजता घडला.

याप्रकरणी सचिन मदन बनसोडे (वय ४४, रा. भोपळे चौक, कॅम्प) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भाचा आकाश गोरख कांबळे (रा. भोपळे चौक, कॅम्प) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार अविनाश ऊर्फ बंड्या याच्यावर गुन्हा दाखल केला असून दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन बनसोडे हे रिक्षाचालक असून आकाश कांबळे हा त्यांचा भाचा आहे. कांबळे यांनी फिर्यादी यांना फोन करुन बोलावून घेतले. त्याप्रमाणे बनसोडे रिक्षा घेऊन तेथे गेले असताना कांबळे याने त्यांच्याकडे एक हजार रुपये मागितले.

त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर कांबळे याने त्यांना रिक्षातून बाहेर ओढून हाताने चापट्या मारल्या. त्यांच्या खिशातील १ हजार ५० रुपये जबरदस्तीने काढून घेऊन त्यांना धक्काबुक्की केली.

दरम्यान, अविनाश याने त्यांच्याकडील रिक्षाची चावी हिसकावून घेतले. दोघे ही रिक्षा घेऊन पळून गेले. पोलिसांनी आकाश कांबळे याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!