पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात द्राक्षांची खास आरास, संकष्टीनिमित्त सजला मंडप….!


पुणे : नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम आणि रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास दगडूशेठ गणपतीला करण्यात आली आहे. यामुळे याचे फ़ोटो सध्या व्हायरल होत आहेत.

काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा आणि सभामंडप सजवण्यात आला आहे. द्राक्षं नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत. आज भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी सांगितलं, की द्राक्षाच्या हंगामात सलग दुसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली आहे.

दरम्यान, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात द्राक्ष महोत्सव साजरा होत आहे. यामुळे सध्या याठिकाणी सकाळपासून अनेक भाविक गर्दी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!