पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार, उच्चभ्रू परिसरातील प्रकाराने सगळेच हादरले…


पुणे : बाणेर भागात मसाज केंद्रांच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. त दोन ठिकाणी छापे टाकून अवैध व्यवसाय उघडकीस आणले गेले. शहरात अशा प्रकारच्या घटनांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर भूमिका घेतली आहे, ज्यामुळे सर्वत्र तपासणी मोहीम तीव्र झाली आहे.

बालेवाडी फाटा भागातील ‘वेदा स्पा नावाच्या मसाज पार्लरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या हाती लागली. या माहितीच्या आधारावर, पोलिसांनी तात्काळ पावले उचलत संबंधित ठिकाणी धाड टाकली. या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याला चाप बसला.

तसेच या कारवाईमध्ये, पार्लरची संचालिका ज्योतीदेवी देवनारायण घोष वय ३८ वर्षे, आणि अमनगिरी गोस्वामी वय २३ वर्षे, (राहणार मुकाई चौक रावेत यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या छाप्यात, मसाज पार्लरचा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेला २२ वर्षीय मोहिमुद्दीन अहमद अली याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यासह, ते पार्लर चालवणारी महिला आणि संबंधित जागेचा मालक यांच्यावरही कायदेशीर कारवाई करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, व्यवस्थापक अली सध्या पोलीस कोठडीत आहे.

बाणेर परिसरातीलच ‘२४ थाई स्पा’ या अन्य एका मसाज पार्लरमध्येही अशाच स्वरूपाचा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. सुरुवातीला एका बनावट ग्राहकाच्या साहाय्याने या माहितीची सत्यता पडताळण्यात आली व त्यानंतर तात्काळ छापा टाकण्यात आला.

ही महत्त्वपूर्ण कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव आणि सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक दीपाली पाटील, रुपेश चाळके तसेच पोलीस यांनी या कामगिरीत सक्रिय सहभाग घेतला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!