धक्कादायक! लोणावळ्यात नराधम बापाचं पोटच्या मुलीसोबत विकृत कृत्य, पत्नी बाहेर जाताच….


पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यात रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. घरात कुणी नसल्याचं बघून मुलीवर जबरदस्ती करत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लोणावळ्याच्या जवळील कुसगावमध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, . मुलीला एकटं पाहून बापाची नियत बिघडली आणि त्याने तिच्यासोबत गैरकृत्य केले. नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने ही माहिती कुणाला दिलीस तर ठार मारेन, अशी धमकीही मुलीला दिली. पण आई घरी आल्यानंतर तिने सगळा प्रसंग आपल्या आईला सांगितला.

यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तसेच २० जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी एकटी होती. तिची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. मुलगी घरी एकटी आहे याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर बलात्कार केला.

घटनेची माहिती कुणाला सांगू नको यासाठी देखील आरोपीने मुलीला धमकी दिली होती. पण आई घरी आल्यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. हे ऐकून मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत पोलिसांनी नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. बापानेच पोटच्या मुलीवर अशाप्रकारे अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!