छत्रपती संभाजीनगरात एक जांभूळ दहा रुपयाला; किलोचा दर चारशे रुपयांवर!


छत्रपती संभाजीनगर : सध्या आंब्याचा सीजन अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे खवय्यांचे चोचले इतर फळांकडे वळत आहे. सध्या आंब्याचे दर आटोक्यात आले असताना पण अशात आंब्यांना जांभळाने  मागे टाकले आहे. कारण आंब्यापेक्षा जांभळं महाग झाली आहेत.

विशेष म्हणजे एक जांभूळ दहा रुपयाला मिळत असून, किलोचा दर चारशे रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा दिलासा मिळत आहे.

विशेष म्हणजे यावेळी झालेल्या परतीच्या पावसाचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे यंदा जांभळाला चांगला दर मिळत आहे.

काळेभोर जांभूळ डोळ्यासमोर आलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. मात्र आता त्याच जांभळाला सोन्याचा दर मिळतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. त्याचं कारण म्हणजे जांभळाला एका किलोचा भाव हा चारशे रुपयापर्यंत झाला आहे.

विशेष म्हणजे एक किलोमध्ये येणाऱ्या जांभळांची संख्या पाहिली तर एक जांभूळ दहा रुपयाला पडतोय. छत्रपती संभाजीनगर शहरातील गुलमंडीवर विक्रीसाठी आलेल्या दोन टोपल्या प्रत्येकी 16 हजार रुपयाला विकत आहेत. महत्वाचे म्हणजे एवढा दर असून देखील ही जांभळं तासाभरात हातोहात विकतायत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!