कुत्रा चावून मृत्यू झाल्यास कुटुंबाला ५ लाख रुपये, जखमींना ५ हजार भरपाई, सरकारने घेतला मोठा निर्णय…


नवी दिल्ली : देशभरात भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात दरवर्षी जवळपास २० ते २५ लाख लोकांना कुत्रे चावतात आणि त्यापैकी २० ते २५ हजार नागरिकांचा मृत्यू रेबीजसारख्या गंभीर आजारामुळे होतो.

महाराष्ट्रासह पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांत कुत्रा चावण्याची सर्वाधिक नोंद आहे. ५-१५ वर्षापर्यंतच्या लहान मुलांना याचा सर्वाधिक धोका असतो. सकाळी-सायंकाळी फिरायला जाणारे ज्येष्ठ नागरिक, रस्त्यावर खेळणारी किंवा काम करणारी मुलांना याचा धोका असतो. कर्नाटक सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

नवीन निर्णयानुसार, भटक्या कुत्र्याने चावल्याने मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबाला ५ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. तर जखमींना ५००० रुपयांची भरपाई देण्यात येईल. मृत्यू किंवा गंभीर जखम झाल्यास पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. वाढत्या घटनांविषयी माहिती मिळताच सरकारने तातडीने हा निर्णय लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

       

सरकारने स्पष्ट केले आहे की ही योजना फक्त भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांसाठी लागू आहे. त्वचेत खोलवर छिद्र पडणे, मोठ्या जखमा, शरीरावर काळेनिळे डाग पडणे किंवा एकाच वेळी अनेक ठिकाणी चावा घेणे अशा गंभीर जखमांच्या परिस्थितीतच ५००० रुपयांची मदत मिळेल.

यातील ३५०० रुपये थेट पीडिताला दिले जातील, तर १५०० रुपये उपचारासाठी ‘सुवर्ण आरोग्य ट्रस्ट’कडे जमा केले जातील. यामुळे जखमींना तातडीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे. शहरांमध्ये जास्त प्रमाणात दिसणाऱ्या कुत्रा हल्ल्यांच्या घटनांवर आळा बसण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

कर्नाटकनंतर तामिळनाडूतही चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ २०२४ मध्येच तामिळनाडूत ५.२५ लाख लोकांना कुत्र्याने चावल्याची नोंद झाली असून २८ नागरिकांचा रेबीजमुळे मृत्यू झाला आहे. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी ही आकडेवारी जाहीर करत भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!