देश हादरला ! पाटण्यात 73 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून हत्या, गुप्तांगात पाईप
पाटणा : पाटण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी 73 वर्षीय महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राजधानी आणि पोलीस मुख्यालयापासून काही किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. बलात्कार करताना एक एक अवयव विकृत करण्यात आला.
बदमाशांनी गुप्तांगात पाईप टाकून शरीराला गंभीर इजाही केली. यामुळे कारवाईची मागणी केली जात आहे.
मृतदेहाची अवस्था पाहून फुलवारीशरीफ परिसरात शांतता पसरली आहे. लोक स्तब्ध आहेत.
मृतदेहाची स्थिती पाहणारे लोक गँगरेपच्या क्रूरतेची ग्वाही देत आहेत, परंतु पोलीस मात्र याची पुष्टी करत नाहीत कारण ते पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या नशेडींनी हे सर्व केले असावे, अशी भीती महिलेच्या मुलाने व्यक्त केली.
पोलीस अधिकारी विक्रम सिहाग म्हणाले की, पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच हे प्रकरण समोर येईल. या घटनेमुळे मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस तपास करत आहेत.