अयोध्येत क्रुरतेने परिसीमा ओलांडली, तरुणीवर बलात्कार करुन हत्या, बरगड्या तोडून शरीरावर…


अयोध्या : अयोध्यातील एका गावात २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार करण्यात आले. हा अत्याचार इतका भयंकर होता की, त्यात तरुणीचा मृत्यू झाला. उतर प्रदेशमधील या भयानक घडनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवालात तरुणीचा मृत्यू अत्यधिक रक्तस्त्रावामुळे झाल्याचे नमूद केल्याचे समजते. तिच्या बरगड्याही तुटलेल्या होत्या आणि शरीरावर ३० हून अधिक जखमा होत्या. शरीरावरील जखमांवरून तिच्यासोबत झालेल्या अमानुषतेचे स्पष्ट होते.

अयोध्या जवळच्या एका गावातील गतिमंद तरुणी गुरुवारी रात्री गावातील भंडाऱ्यात गेली होती. शनिवारी दुपारी तिचे निर्वस्त्र शव गावाबाहेर एका कोरड्या नाल्यात सापडले. तिचे हात-पाय झाडाच्या वेलींनी बांधले होते. तिच्या खासगी अवयवांवरही खोल जखमा होत्या.

तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांनी शनिवारी दुपारच्या सुमारास डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन केले.

मात्र रविवारी दुपारपर्यंत शवविच्छेदन अहवाल देण्यास पोलीस अधिकारी टाळाटाळ करत होते. इतक्या गंभीर प्रकरणातही शवविच्छेदन अहवाल पोलिसांकडे उपलब्ध  नसल्याने पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!