पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; कर्ज फेडलं नाही तर बंद होणार ६०००?

पुणे:केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. पीएम किसान योजनेत २१ वा हप्ता देण्यात आला आहे. दरम्यान आता या योजनेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डमध्ये लोनदेखील मिळते. जर हे लोन नाही भरले तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, असं सांगण्यात येत आहे
याआधी नीलगिरी जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या प्रकरणात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये बँकेने पीएम किसान योजनेचे पैसे थांबवले होते. शेतकऱ्यांनी त्याच बँकेतून कर्ज घेतले होते. परंतु वेळेवर कर्ज फेडले नव्हते. त्यामुळे बँकेने पीएफ किसान योजनेअंतर्गत पाठवलेले १६००० रुपये बंद केले होते.
दरम्यान, याबाबत त्यांना ग्राहक आयोगात तक्रार केली होती. यावेळी एक महत्त्वाचा निर्णय दिला होता. शेतकऱ्याने जरी लोनचे पैसे भरले नसतील तरीही केंद्र सरकारद्वारे पाठवलेली सब्सिडी थांबवू शकत नाही. त्यामुळे हे पैसे पुन्हा शेतकऱ्याला देण्याचे आदेश दिले होते.

या प्रकरणात बँकेला शेतकऱ्याचे संपूर्ण पैसे द्यावे लागले. याचसोबत २००० रुपयेदेखील अतिरिक्त द्यावे लागले. कोणत्याही प्रकारचे बँक लोन न भरल्याने सरकारद्वारे दिलेले पैसे बँक रोखू शकत नाही.

