मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात महत्वाची अपडेट; पार्थ पवारांच्या मामेभावावर अटकेची टांगती तलवार?


पुणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या मुंढवा जमीन घोटाळ्याप्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेले दिग्विजय पाटील यांनी पुणे सत्र न्यायालयातील त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता त्यांना पुणे पोलीस अटक करणार की त्यांना नव्याने अटकपूर्व अर्ज दाखल करण्याची संधी देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली. तर त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्यावर मात्र अटकेची टांगती तलवार कायम राहिली आहे. या घोटाळ्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज दिग्विजय पाटील यांनी दाखल केला होता.मात्र या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर नवीन मुद्द्यांच्या आधारे पुन्हा अटकपूर्वक जामीन अर्ज दाखल करण्यासाठी दिग्विजय पाटीलने आधी केलेला अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मुंढवा येथील जमीन व्यवहारात अमेडिया कंपनीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दिग्विजय पाटील हे या कंपनीचे भागीदार असल्याने तपासाचा केंद्रबिंदू त्यांच्यावर आला आहे. जमीन व्यवहारात आर्थिक अनियमितता आणि दस्तऐवजांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दरम्यान आता अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे पोलिसांकडून लवकरच कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तपास यंत्रणा संबंधित कागदपत्रे आर्थिक व्यवहार आणि जमीन हस्तांतरण प्रक्रियेची सखोल चौकशी करत आहे. आता दिग्विजय पाटील यांना अटक होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!