अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची अपडेट! एचआयव्ही रिपोर्टमधून धक्कादायक उलगडा, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह?

नाशिक : महिलांवरील अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात अटकेत असलेला भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी सतत नवे खुलासे होत आहेत.अशातच आता अशोक खरातचा वैद्यकीय अहवालही समोर आला आहे. त्यामध्ये खरातची एचआयव्ही टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

अध्यात्माच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याचा आरोप असलेला भोंदू बाबा अशोक खरात या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात खरातने शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे पीडितांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. त्यावेळी विविध चाचण्या करण्यात आल्या असून त्यात एचआयव्ही चाचणीचाही समावेश होता.आता त्याचा एचआयव्ही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र तरी गुन्ह्याच्या स्वरूपामुळे तपास अधिकच तीव्र करण्यात आला
खरातच्या तपासात आतापर्यंत 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. अनेक पीडित महिला भीतीमुळे समोर येण्यास टाळाटाळ करत असल्याचेही समोर आले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

खरातच्या संपर्कात जे जे लोक होते त्या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे.तसेच मोबाईल डेटा पूर्णपणे रिकव्हर झाल्यानंतर अनेक संभाषणे आणि संबंधित व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.