माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शिक्षणाधिकाऱ्यांकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी, जाणून घ्या..


पुणे : राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात शैक्षणिक वर्ष 2025 26 मधील सुट्ट्यांची सविस्तर यादी देण्यात आली आहे. या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र 16 / 6 / 2025 ते 16 / 10 / 2025 या काळात आयोजित केले जाणार आहे.

तसेच शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र 3 / 11 / 2025 ते 1 / 5 / 2026 या काळात आयोजित केले जाणार आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2026 – 27 सोमवार दिनांक 15 जून 2026 पासून सुरू होणार आहे. जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याची माहिती दिली आहे.

यामध्ये रविवार वगळता उन्हाळी सुट्ट्या 37 दिवस राहतील. या शैक्षणिक वर्षात विभागीय आयुक्त यांच्या अधिकारात तीन सुट्ट्या राहतील. मुख्याध्यापक यांच्या अधिकारात तीन सुट्ट्या राहतील. दिवाळीची सुट्टी 17 ऑक्टोबर 2025 ते एक नोव्हेंबर 2025 या काळात राहणार आहे. रविवार वगळता दिवाळीच्या सुट्ट्या 13 दिवस राहतील. असे सांगितले आहे.

तसेच उन्हाळी सुट्टी दोन मे 2026 ते 13 जून 2026 या काळात राहणार आहे. यामध्ये आता रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद, अनंत चतुर्दशी, घटस्थापना, महात्मा गांधी जयंती / दसरा, गुरुनानक जयंती, ख्रिसमस, मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, धुलीवंदन अशा प्रकारे सुट्टी राहणार आहे.

तसेच गुढीपाडवा, रमजान ईद ( ईद-उल-फितर), रामनवमी, महावीर जयंती,गुड फ्रायडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महाराष्ट्र दिन /बुद्ध पौर्णिमा, दिवाळी व उन्हाळी सुट्टीत येणारे सण, दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन), दिवाळी (बलिप्रतिपदा), भाऊबीज, बकरी ईद,सहा जुलै 2025 : मोहरम / आषाढी एकादशी अशा सुट्टी आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!