वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी! आता FASTag चे नियम बदलले, जाणून घ्या…


पुणे : चारचाकी वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवीन FASTag मिळवताना आता ‘नो युवर व्हेईकल’ म्हणजेच KYV प्रक्रिया पूर्ण करावी लागणार नाही.

राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय भारतीय राजमार्ग प्राधिकरणाने नियमांमध्ये हा महत्त्वाचा बदल लागू केला आहे, ज्यामुळे वाहनधारकांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचणार आहेत.

राष्ट्रीय भारतीय राजमार्ग प्राधिकरणाने कार, जीप आणि व्हॅनसारख्या खाजगी वाहनांसाठी असलेली KYV अट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल १ फेब्रुवारी २०२६ पासून जारी होणाऱ्या सर्व नवीन FASTag साठी लागू राहील.

यानुसार, वाहनधारकांनी FASTag ॲक्टिव्ह केल्यानंतर वेगळी KYV प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज राहणार नाही, कारण सर्व आवश्यक तपासणी आधीच केली जाणार आहे. पूर्वी FASTag वापरकर्त्यांना वैध कागदपत्रे सादर करूनही, तसेच टोल प्लाझावर FASTag वापरूनही KYV प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुन्हा-पुन्हा बँकांकडे जावे लागत होते.

तसेच यामुळे ॲक्टिव्हेशन प्रक्रियेत विलंब होत असे आणि अनेक तक्रारी नोंदवल्या जात होत्या. ही अडचण दूर करण्यासाठी आता ॲक्टिव्हेशननंतरची KYV प्रक्रिया रद्द करून संपूर्ण पडताळणी अॅक्टिव्हेशनपूर्वीच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या वाहनांवर आधीपासून FASTag आहे, त्यांच्यासाठी नियमित KYV करण्याची आवश्यकता राहणार नाही. केवळ चुकीची वाहन श्रेणी, डुप्लिकेट किंवा चुकीचा FASTag जारी होणे, सैल किंवा खराब FASTag, तसेच FASTag चा संशयास्पद गैरवापर अशा प्रकरणांतच तपासणी केली जाईल. अन्यथा विद्यमान FASTag पूर्वीप्रमाणे सक्रिय राहतील आणि कोणतीही अतिरिक्त प्रक्रिया करावी लागणार नाही.

दरम्यान, नवीन नियमांनुसार, FASTag जारी करणाऱ्या बँकांवर ॲक्टिव्हेशनपूर्वी वाहनांची संपूर्ण पडताळणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही तपासणी ‘वाहन’ डेटाबेसच्या आधारे केली जाईल. जर त्या डेटाबेसमध्ये माहिती उपलब्ध नसेल, तर वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र वापरून तपासणी केली जाईल.

पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय FASTag ॲक्टिव्ह केला जाणार नाही. ऑनलाइन किंवा ऑफलाइन कोणत्याही माध्यमातून घेतलेला FASTag असला तरीही ही प्रक्रिया बंधनकारक असेल. एनएचएआयच्या मते, या बदलामुळे वापरकर्त्यांच्या तक्रारी आणि कार्यात्मक अडचणी मोठ्या प्रमाणात कमी होतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!