रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ महत्वाच्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन…

मुंबई : राज्यात सध्या 11 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. या गाड्यांना राज्यातील प्रवाशांच्या माध्यमातून चांगला अभूतपूर्व प्रतिसाद सुद्धा मिळतोय. असे असताना आगामी काळात पुणे ते नागपूर या मार्गावर सुद्धा वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना आहे.
यामध्ये महत्वाची बाब अशी की आगामी काळात पुणे ते नागपूर या मार्गावर सुद्धा वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे आता देशातील आणखी एका महत्त्वाच्या मार्गावर वंदे भारत ट्रेन चालवण्याची रेल्वेची योजना असल्याची बातमी समोर आली आहे.
यामध्ये आता पटना ते गोरखपुर दरम्यान वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे. यामुळे ही एक आनंदाची बातमी आहे. गोरखपुर पटना वंदे भारत एक्सप्रेस सकाळी सहा वाजता गोरखपुर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
अकरा वाजता ही गाडी पटना रेल्वे स्थानकावर जाईल. पटना गोरखपूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत बोलायचं झालं तर ही गाडी दुपारी दोन वाजता पटना रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. रात्री आठ वाजता गोरखपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
गोरखपुर, पटना आणि मुजफ्फरपुर सारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा घेईल अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिकृतपणे माहिती समोर आली नसती तरी येणाऱ्या काळात अशी माहिती आहे. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने गोरखपुर ते पटना असा प्रवास केला तर तिकीट दर हे सहाशे रुपये इतके राहणार आहेत.
दरम्यान, देशातील वंदे भारत एक्सप्रेसचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. सध्या स्थितीला संपूर्ण देशात 136 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत आणि ही संख्या आता आगामी काळात आणखी वाढणार आहे. यामुळे याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.