रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सिंहगड, डेक्कन क्वीनसह ‘या’ रेल्वे गाड्या रद्द, जाणून घ्या..


पुणे : मुंबईत सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मुंबईत अनेक लोकल गाड्या करण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर पुणे-मुंबई रेल्वे मार्गातील लोणावणा-खंडाळा घाटातही जोरदार पाऊस बरसत आहे, यामुळं आज आणि उद्यासाठी (१९-२० जुलै) पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या पाच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, इंटरसीटी एक्सप्रेस, डेक्कन एक्स्प्रेस तसेच इंद्रायणी एक्सप्रेस या ५ रेल्वे गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत.

तसेच जोडीच्या रेक उपलब्ध नसल्यानं उद्यासाठी याच ५ गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे यामुळे पुण्याहून मुंबईसाठी प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसह इतर प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

आज रद्द झालेल्या रेल्वे गाड्या –
अप मार्गावर

पुणे-सीएसएमटी इंटरसीटी एक्स्प्रेस

पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस

पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस

डाऊन मार्गावर

सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

सीएसएमटी-पुणे सिंहगड एक्स्प्रेस

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!