पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या मुख्य रस्त्यावरील शाळा- कॉलेजला सुट्टी; काय आहे कारण?


पुणे : पुण्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. उद्या प्रमुख रस्त्यावरील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ ही एक सायकलिंग स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जाहीर केले आहेत.१९ जानेवारी म्हणजेच उद्या सोमवारी मुख्य रस्त्यावरील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रस्ता तसेच या मार्गांना जोडणारे उपरस्ते यांचा समावेश आहे. ही सर्व कॉलेज आणि शाळा मुख्य रस्त्यावर आहेत.

पुणे शहरात १९ ते २३ जानेवारी या कालावधीत आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहे.पुणे ग्रँड चॅलेंज टूर २०२६ ही एक सायकलिंग स्पर्धा आहे. यामुळे संपूर्ण शहरात सायकल चालवली जाणार आहे.या स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ १९ जानेवारी रोजी पुणे शहरात होणार आहे. यानिमित्त सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहेत.

या विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजला जाण्यात अडचण येऊ नये या पार्श्वभूमीवर शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!