पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! गणेशोत्सव काळात’ या’ दोन दिवशी मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार ; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.


पुणे : गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेंतील अतिशय महत्त्वाचा सण असून,पुणे जिल्हा हा गणेशभक्ती आणि गणेशोत्सवासाठी विशेष ओळखला जातो. लाखो गणेशभक्त या काळात गणपती बाप्पाचे स्वागत करतात,मिरवणुका काढतात आणि उत्साहाने सहभागी होतात. या पार्श्वभूमीवरच जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) या दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात मद्यविक्री पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गणेशोत्सव काळात वाहतुकीच्या नियमापासून ते ध्वनी प्रदूषण आणि मद्यविक्रीच्या नियमापर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे निर्णय घेतले असून गणरायाची मिरवणूक संपेपर्यंत सर्व दुकाने व आस्थापनेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा निर्णय महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत घेण्यात आला असून, सार्वजनिक शांतता सुनिश्चित करणे हा उद्देश आहे.

दरम्यान गणेशोत्सवात ध्वनीवर्धक वापरासाठी आधी दिलेल्या सात दिवसांच्या सवलतीत बदल करण्यात आला आहे. याअंतर्गत, १ सप्टेंबर (सहावा दिवस) ऐवजी आता ५ सप्टेंबर (दहावा दिवस) या दिवशी ध्वनीवर्धक वापरण्यास परवानगी असेल. हा दुरुस्त आदेश ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० अंतर्गत जारी करण्यात आला आहे

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!