पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत मोठे बदल; शनिवार आणि रविवारी…


पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असून वाहतूक विभागाकडून रस्त्यावरील ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत असतात.

आता बांधकामासाठी आवश्यक जड वाहनांना नियंत्रित स्वरुपात परवानगी देण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंध सशर्त शिथिल करण्यात आले आहेत. नवीन आदेशानुसार शनिवारी आणि रविवारी बांधकामाशी संबंधित वाहनांना शहरातून वाहतुकीची परवानगी असेल.

पुणे शहरातील रस्त्यांवरची गर्दी कमी करण्यासाठी ही परवानगी प्रायोगिक तत्त्वावर दिली जात आहे. सर्व बांधकाम व्यावसायिक व वाहनचालकांना आदेशाचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास मोटार वाहन कायद्यानुसार थेट कारवाई होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, शनिवारी २ ते २३ ऑगस्ट या काळात दर शनिवारी आणि १५ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जड वहानांना दुपारी ४ ते रात्री १० ही वेळ वाहतुकीसाठी परवानगी राहील. तसेच ३ ते २४ ऑगस्ट या कालावधीत रविवारी वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या रेड झोनसह शहरात सर्वत्र अवजड वाहनांना वाहतुकीची परवानगी असेल.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!