HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी सेवा राहणार बंद, जाणून घ्या..

पुणे : देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकेने जाहीर केले आहे की, या आठवड्याच्या शेवटी काही डिजिटल सेवा तात्पुरत्या बंद राहतील. त्यामुळे ग्राहकांनी आपले महत्त्वाचे व्यवहार वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बँकेने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री १२ ते दुपारी १२ या वेळेत बँकेच्या नेटबँकिंग आणि मोबाईल बँकिंग सेवा बंद राहतील. या काळात देखभाल आणि तांत्रिक सुधारणा केली जाणार आहे. त्यामुळे एकूण १२ तास ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग सेवा वापरता येणार नाहीत.

एचडीएफसी बँकेने ईमेल आणि एसएमएसद्वारे ग्राहकांना आधीच कळवले आहे की, या काळात आपल्या व्यवहारांची पूर्वतयारी करावी. बँकेने सांगितले आहे की, ज्यांना तत्काळ व्यवहार करायचे असतील, त्यांनी PayZapp, MyCards किंवा WhatsApp ChatBanking या पर्यायांचा वापर करावा.

याशिवाय, बँकेने ग्राहकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. बँकेने स्पष्ट केले की ती कधीही ईमेल, फोन किंवा एसएमएसद्वारे पासवर्ड, OTP किंवा कार्ड डिटेल्स विचारत नाही. त्यामुळे कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये.
या देखभालीच्या काळात बँकेच्या काही सेवा मात्र सामान्यपणे सुरू राहतील. त्यात ATM सेवा, UPI पेमेंट्स आणि क्रेडिट कार्ड पोर्टल यांचा समावेश आहे. त्यामुळे लहान व्यवहार किंवा रोख रक्कम काढण्यावर याचा परिणाम होणार नाही.
एचडीएफसी बँकेने सांगितले की, त्यांच्या प्रणालींच्या सुरक्षिततेसाठी आणि गती सुधारण्यासाठी वेळोवेळी तांत्रिक सुधारणा केल्या जातात. त्यामुळे ही अडचण केवळ तात्पुरती आहे आणि सेवा १५ नोव्हेंबर दुपारी १२ नंतर पुन्हा सुरू होतील.
दरम्यान, ग्राहकांनी या काळात त्यांच्या सर्व महत्त्वाच्या बिल पेमेंट्स, मनी ट्रान्स्फर किंवा EMI व्यवहार आगाऊ पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. अन्यथा, बँकिंग सेवा तात्पुरती बंद असल्यामुळे काही व्यवहारांमध्ये उशीर होऊ शकतो. तांत्रिक दृष्टीने बँकिंग सुरक्षित ठेवण्यासाठी या प्रकारच्या अपग्रेड प्रक्रिया आवश्यक असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे.
