शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २२ वा हप्ता ‘या’ महिन्यात जमा होणार, महत्वाची माहिती आली समोर..


पुणे : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत २१ हप्त्यांचा लाभ मिळाल्यानंतर आता शेतकरी २२व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मात्र, यावेळी सरकारकडून काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढील २००० रुपयांचा हप्ता थांबू शकतो अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.पीएम किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ही रक्कम दर चार महिन्यांनी २००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक खर्च भागवण्यासाठी मोठा आधार मिळतो. आता मात्र २२व्या हप्त्यापूर्वी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता फेब्रुवारी २०२६मध्ये जारी केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर वेळोवेळी अपडेट तपासत राहणे आवश्यक आहे. कोणतीही अधिकृत सूचना किंवा तारीख जाहीर झाल्यास ती थेट पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यावेळी हप्ता वितरणात विलंब होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नवीन नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांचा हप्ता अडकण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पीएम किसान योजनेत यावेळी सर्वात मोठा बदल म्हणजे युनिक Farmer ID अनिवार्य करण्यात आली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की केवळ e-KYC पूर्ण करून चालणार नाही, तर ज्यांच्याकडे Farmer ID नसेल, त्यांचा २२ वा हप्ता रोखला जाऊ शकतो. Farmer ID ही शेतकऱ्यांची डिजिटल ओळख असून, त्यामध्ये जमीनधारणा, पिकांची माहिती, शेतीशी संबंधित तपशील आणि उत्पन्नाचा रेकॉर्ड समाविष्ट असतो. योजनेचा लाभ केवळ पात्र शेतकऱ्यांनाच मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!