शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दिवाळीनंतर पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता येणार, समोर आली मोठी अपडेट…

नवी दिल्ली : शेतकऱ्यांसाठी खास तयार केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत तीन हप्त्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

यावर्षी या योजनेचा २१ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे. देशभरातील लाखो शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागील काही दिवसांपासून अशी चर्चा सुरू होती की, सरकार दिवाळीपूर्वीच हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल.

मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून किंवा कृषी विभागाकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. तसेच दिवाळी जवळ आल्याने आता या कालावधीत हप्ता येण्याची शक्यता कमी मानली जात आहे.

दरम्यान, पीएम किसान योजनेत शेवटचा हप्ता ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता. हा हप्ता लांबणीवर गेला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पैसे जमा होण्याची शक्यता होती. मात्र, दिवाळीला सुरुवात झाली असूनही पैसे जमा झालेले नाही. त्यामुळे नक्कीच हा हप्ता दिवाळीनंतर दिला जाईल.
पीएम किसान योजनेत काही शेतकऱ्यांच्या खात्यात आधीच पैसे जमा करण्यात आले आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि उत्तराखंडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा झाले आहेत. या राज्यातील शेतकऱ्यांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्यांना आधीच पैसे देण्यात आले. लवकरच इतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.
