शिरुर-हवेलीत महत्वाचे प्रश्न भाजपनेच सोडविले ! विधानसभेत भाजपला यश निश्चित – चंद्रशेखर बावनकुळे

उरुळी कांचन : हवेली तालुक्यात जिल्हा बँक,पीएमआरडीए , ग्रामपंचायत ,बाजार समिती निवडणूकीत भाजपने मिळविलेले यश हे कार्यकर्ते व पदाधिकारी व नेते मंडळींच्या यशाचे फळ आहे.

विकासासह सामान्य नागरीकांचे प्रश्न सुटण्यासहीत केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हवेली तालुक्यात चालू असलेली धडपड प्रशंसनीय आहे. त्यामुळे शिरूर – हवेली विधानसभा मतदार संघात प्रदिप कंदांच्या रुपात यश निश्चित मिळेल असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.
लोणीकंद (ता.हवेली) येथे शिरूर-हवेली भाजपच्या मध्यवर्ती डिजीटल कार्यालयाचा शुभारंभ व जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बोलत होते..यावेळी ते या कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी आमदार राहुल कुल,जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद, हवेली भाजपचे तालुकाध्यक्ष पै.संदिप भोंडवे, शिरुर भाजपचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष आबासाहेब सोनवणे,माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाचर्णे,भाजपच्या राज्य कार्यकारणी सदस्य जयश्री पलांडे,भाजपचे नेते दादासाहेब फराटे,भाजपचे सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे,आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले, जागतिक रिपोर्ट प्रमाणे जगाच्या १५० देशांनी ७८ टक्के पसंती म्हणून लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे.देशाला विकास,आत्मनिर्भर तसेच प्रगतीपथाक डे नेण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांची विकासाची घौडदौड सुरू आहे. १ रुपयात शेतकरी विमा ते ६ हजार रुपये मानधन , सिंचनाची कामे इ. निर्णय सरकारने घेतले आहेत. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी संदिप भोंडवे यांनी सुरू केलेल्या डिजिटल पक्ष कार्यालयाच्या भव्यतेचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी प्रदिप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अभिष्टचिंतन केले आहे.
बाजार समितीप्रमाणे कारखाना प्रश्न सुटेल – आमदार राहुल कुल
हवेली तालुक्यात सहकार क्षेत्रात बाजार समिती व कारखाना हे दोन महत्वाचे प्रश्न सोडविण्यात राज्य सरकारच्या वतीने देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे हे महत्वाची भूमिका घेत आहेत. बाजार समिती प्रशासकीय राजवटीतुन मुक्त झाली असून आता यशवंत कारखान्याला चालू करण्याचे दृष्टीने महत्वाची पाऊले उचलण्यात येतील असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.