संतोष देशमुख प्रकरणी मोठी माहिती आली समोर, आरोपीचा कोठडीतून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा..

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. विष्णू चाटे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे विष्णू चाटे जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली होती. खंडणी प्रकरणातील पंधरा दिवसाच्या कोठडीनंतर खून प्रकरणात दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.

कोठडीची मुदत संपली असल्याने आज पुन्हा एकदा विष्णू चाटेला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने विष्णू चाटे याला १८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे आरोपी आहे पुरवणी आणि जबाबांमध्ये विष्णू चाटेचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आलेले आहे. खंडणी प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून विष्णू चाटेला हत्या प्रकरणांमध्ये कोर्टासमोर हजर केलं होतं. विष्णू चाटेवर मोक्का लावण्यात आला आहे.
