पुणे रेल्वे स्थानकावर बेकायदेशीर तिकीट विक्री थांबणार, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय….


पुणे : बेकायदेशीर तिकीट विक्री रोखण्यासाठी पुणे शहरातील रेल्वे स्थानकावर पहिला प्रयोग केला जाणार आहे. यामुळे २४ तास प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय असणारे कॅमेरे बसवले जाणार आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर जिओ कंपनीकडून एआय असलेले चार कॅमेरे येत्या पंधरा दिवसांत बसवण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर असणारा हा प्रयोग ३० दिवस चालणार आहे. ३० दिवसानंतर यासंदर्भातील अहवाल पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.

चार कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा प्रवेश करताना दुसरा बाहेर पडताना तर इतर दोन कॅमेरे आरक्षण केंद्रात लावण्यात येणार आहे. हे सर्वांना लक्ष ठेवणार आहे. एआय असणारे हे कॅमेरे इतरांपेक्षा वेगळे असणार आहे.

या कॅमेऱ्याची नजर प्रत्येक हालचालींवर असणार आहे. व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि तापमानसुद्धा हे ओळखणार आहे. यामुळे बेकायदेशीर तिकीट विक्री करणारे लगेच नजरेत येणार आहेत. तसेच या परिसरात किंवा रांगेत किती जण उभे आहेत, त्याची गणनासुद्धा हे कॅमेरे करणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!