पूर्व हवेलीत अवैध वाळू धुण्याचा पर्दाफाश; दोन ठिकाणी प्रशासनाची मोठी कारवाई…


लोणी काळभोर : पूर्व हवेलीत माती मिश्रीत वाळू धुणाऱ्या दोन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. यांमुळे वाळू वॉशिंग सेंटर चालकांचे धाबे दणाणले आहे.

अपर लोणी काळभोर या कार्यक्षेत्रामध्ये गेले काही दिवस अनाधिकृत माती मिश्रित वाळूचा उपसा व वाहतूक केल्याच्या अनेक तक्रारी महसूल प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे आणि उपविभागीय अधिकारी हवेली यांच्या सूचनांनुसार तहसील कार्यालय लोणी काळभोर यांच्यामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये सोरतापवाडी या ठिकाणी दोन वाळू अनाधिकृतपणे मातीनिश्रित वाळू धुण्याच्या ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली आणि सदर जागा मालकांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या ठिकाणी वाळू धुण्यासाठी बांधलेला रॅम्प तसेच माती मिश्रित वाळू धुतल्यानंतर शिल्लक राहिलेली माती आणि पाणी आढळून आले,

सदर कारवाई तहसीलदार तृप्ती कोलते यांचे समवेत मंडलाधिकारी थेऊर किशोर जाधव, ग्राम महसूल अधिकारी कुंजीरवाडी मयूर शेवाळे, रामा महसूल अधिकारी कोलवडी अर्जुन स्वामी, कोतवाल थेऊर भंडलकर यांनी केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!