पुण्यात डॉक्टर महिलेचा बेकायदेशीरपणे गर्भपात, गुन्हा दाखल


पुरंदर : पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सोन्याच्या नीरा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. याठिकाणी बेकायदेशीर गर्भपात केला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी डॉ. सचिन रामचंद्र रणवरे याच्यासह जिचा गर्भपात झाला ती दिपाली थोपटे व बरकडे नावाचा एजंट अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

याबाबत जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, डॉक्टर दिपाली थोपटे नावाच्या गर्भवती महिलेचा गर्भपात करणार असल्याची माहिती देखील या ईमेलवर आली होती.

या महिलेस पहिली मुलगी असून बेकायदेशीर रित्या गर्भलिंग निदान केल्यानंतर नीरा येथील बारामती रस्त्यावरील श्रीराम हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रणवरे हा तिचा गर्भपात करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!